शिवनाळा शिवारात वाघाचा गायीवर हल्ला

वाघाच्या दहशतीने बोटोणी परिसरात भीतीचे वातावरण

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव तालुक्यातील बोटोणी परिसरात एका वाघाने गाईची शिकार करून फडशा पाडला. रविवारी दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात शेतक-याचे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

खेकडवाई येथील शेतकरी पंजाब वामनराव पिंपळकर यांची गावालगत असलेल्या शिवनाळा शिवारात शेती आहे. शेत शिवारातच ते राहतात. रविवारी रात्री त्यांनी गोठ्यामध्ये गाय बांधून ठेवली होती. रात्रीच्या सुमारास गायीवर एका वाघाने हल्ला केला. गाईने बचावासाठी हंबरडा फोडला. मात्र हल्ल्यात गाय ठार झाली. त्यानंतर वाघाने गायीचा फडशा पाडला.

दुस-या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेत शेतक-याचे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. जळका, बोटोणी, सराटी हा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असून यात वाघाचा वावर आहे. अलिकडे वाघाने आपला मोर्चा जंगलाबाहेर वळवल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

Comments are closed.