ज्योतिबा पोटे, मारेगाव: भारिप बहुजन महासंघ मारेगाव तालुक्याच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस संविधान गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता सुभाष नगर येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्याला वंदन करून ही भव्य रॅली शहरातील चौका चौकातून मार्गक्रमण करणार आहे.
रॅलीच्या समारोपानंतर भोजन दानाचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला आहे. भोजनदानानंतर लगेच दुपारी एक वाजता प्रा. डॉ. अशोक कांबळे, यवतमाळ यांचे भारतीय संविधान व आजच्या रिपब्लिकन चळवळीचे भवितव्य या विषयावर जाहीर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष विनोद गाणार तर प्रमुख उपस्थिति भारतीय बौद्ध महासभेचे भगवान इंगळे यांची आहे.
या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान भारिप चे तालुका अध्यक्ष विनोद गाणार, अजाबराव गजभिये, गौतम दारुंडे, गजानन चंदनखेडे, राजेंद्र कर्मनकर, श्रावण सातपुते आदी भारिप च्या कार्यकर्यांनी केले आहे.