गंजीपत्ता जुगार खेळताना चौघांना अटक

पटवारी कॉलोनी येथे पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील घुग्गुस मार्गावर श्रावणी बारच्या मागे अवैधरित्या गंजीपत्ता जुगार खेळताना 4 जणांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. जुगाऱ्यांकडून पोलिसांनी बावन पत्त्यांसह 6 हजार 320 रुपये रोख जप्त केले.
पटवारी कॉलोनी येथे श्रावणी बारच्या मागे काही इसम पैश्याचा जुगार खेळत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी बुधवार 6 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता सदर ठिकाणी रेड केली. त्या ठिकाणी 4 इसम अवैधरित्या बावन गंजीपत्यावर पैशांचे हारजीत खेळताना आढळले. घटनास्थळ वरून पोलिसांनी रमेश महादेव मत्ते रा. ईराणी कॉलनी, पुरुषोत्तम हिरु बोढे रा. जैन ले आऊट, प्रवीण नत्थुजी तुराणकर रा.जैन लेआउट व विजय नत्थुजी विधाते रा. काळे हॉस्पिटल जवळ वणी याना अटक करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12 अ अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

 

हे देखील वाचा  – 

थरार… वणीतील वृद्ध दाम्पत्याच्या कारवर दरोडा… चालकाला बेदम मारहाण…

 

पत्रकार जब्बार चीनी यांना ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.