विवेक तोटेवार, वणी: 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे ‘बंध माणुसकीचे, नाते आपुलकीचे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांद्वारे कपडे तसेच इतर वस्तू गोळा करण्यात आल्या व त्या वस्तूंचे गरजूंना वाटप करण्यात आले. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ विकास जुनगरी व प्रा गणेश माघाडे यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वी करण्यात महाविद्यालयातील प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.