निळापूर येथे तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

भव्य शोभायात्रा ठरले प्रमुख आकर्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील निळापूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रसंतांचे छायाचित्र असलेली प्रतिमा बैलगाडीवर ठवून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा संपल्यावर राष्ट्रसंतांच्या पुतळ्याजवळ सभा घेण्यात आली. यावेळी गावातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनिल बोढाले यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, मुख्याध्यापिका दिकुंडवार, सुखदेवे, सरपंच पूजा बोढाले, स्वप्निल कळसकर यांच्यासह गुरुदेव सेवा महिला मंडळ, ब्राह्मणी येथील बाळ मंडळ यांच्यासह निळापूर आणि ब्राह्मणी येथील ग्राववासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.