विवेक तोटेवार, वणी : मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील सहा वर्षाच्या चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला फाशी द्या. अशी मागणी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदनातुन केली आहे. बुधवार 18 मे रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत किरण देरकर यांनी ही माहिती दिली.
दि. 9 मे रोजी पहापळ येथे 6 वर्षीय बालीकेवर अत्याचाराची अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. नराधमाने बालिकेवर अत्याचार करुन तिला काटेरी झुडपात फेकून दिले होते. असह्य वेदना सहन करीत चिमुकली रात्रभर झुडपात पडून होती. या घटनेची मारेगाव पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन नराधम आरोपी मधुकर भेंडाळे याला वडकी येथुन अटक केली.
सदर प्रकरणी पीडीत चिमूकलीला न्याय मिळवून देण्यासाठी सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन, ओबीसी महासंघ व एकविरा महिला पतसंस्था या सामाजिक संघटना पुढे आले आहे. पहापळ अत्याचार खटला जलद न्यायालयात चालवून आरोपीला फाशी किंवा कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध सामाजिक संघटना यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा किरण देरकर, इंदू किन्हेकर, सुषमा काळे, संध्या पोटे, जिजाताई वरारकर, माधुरी नगराळे, सपना केलोडे, ऍड.हूमैरा शरीफ, सुरेखा भेले, वृषाली खानझोडे, सुरेखा ढेंगळे, कविता सोयाम, अर्चना पिदूरकर, कविता मडावी, कमला नाखले, अपर्णा घागी, रंजना येरगुडे, विद्या मत्ते, प्राची मत्ते, मंगला आसेकर, कल्पना किन्हेकर, मंजुषा पोल्हे, विभा तातकोंडावार, सुवर्णा खामनकर, विभा पोटदुखे आदी महिला उपस्थिती होत्या.
पोलीस विभागाने निर्भया पथकाच्या माध्यमातून गाव तीथे निर्भया पथक नेमून महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालावा. समाजात राहून अनैतीक कृत्य करणाऱ्या नराधमावर कूठल्याही प्रकारची हयगय होता कामा नये. अन्यथा सन्मान स्त्री शक्ती फांउडेशनच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल.
किरण देरकर – अध्यक्षा, सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन वणी
Comments are closed.