तालुक्यातील 1223 शेतकरी 2 महिन्यापासून चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत

चना खरेदीचे 10 कोटी शासनाकडे अडकून, शेतकरी हवालदिल

जितेंद्र कोठारी, वणी : शासनाने नाफेड मार्फत खरेदी केलेल्या चनाचे चुकारे थकविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील तब्बल 1223 शेतकरी मागील दोन महिन्यांपासून चुकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. अनेकदा मागणी करुनही शासनाकडून पैसे आले नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार राज्य शासनाने नेशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NAFED) मार्फत शेतकऱ्याकडून शासकीय दराने चना खरेदी केली. नाफेडने विदर्भ कॉपरेटिव संस्था या नोडल एजन्सीद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात वणी तालुक्यातील 3007 शेतकऱ्यांकडून 50 हजार 318 क्विंटल चना खरेदी केली. खरेदी करण्यात आलेल्या मालाची किंमत 26 कोटी 31 लाख 63 हजार 41 रुपये एवढी आहे.

नाफेडने 6 मे 2022 पर्यंत ज्या शेतकऱ्यांकडून चना खरेदी केली त्या 1784 शेतकऱ्यांच्या 30456.30 क्वि. मालाच्या 15 कोटी 92 लाख 86 हजार 449 रुपयांचा चुकारा 2 जून 2022 पर्यंत केले. मात्र उर्वरित 1223 शेतकऱ्यांच्या 19861.30 क्वि. मालाचे 10 कोटी 38 लाख 76 हजार 691 रुपयांचे चुकारे शासनाने अद्याप शेतकऱ्यांना दिले नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने चुकारे अडकविल्याने वणी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढवला आहे. त्यामुळे शासनाने थकविलेले चुकारे त्वरित देण्याची मागणी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.