विवेक तोटेवार, वणी: दत्त मंदिराचे संस्थापक, संचालक आचार्य श्री जयकृष्णबाबा दर्यापूरकर यांचे सोमवार 4 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज 4 वाजता दत्त मंदिरातून निघणार आहे. अंत्ययात्रा ही दत्त मंदिर, टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, दीपक चौपाटी ते लालगुडा अशी निघणार आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार वणी एमआयडीसी जवळील स्मशानभूमीत होणार आहे. भाविकांनी अंत्ययात्रेत शामिल होण्याचे आवाहन दत्त मंदिर देवस्थान समितीद्वारे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.