शेतकऱ्यांची व्यथा घेऊन मनसे जिल्हाधिकारी दालनात

वणी व मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी : वणी व मारेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, अद्याप शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचे नेतृत्वात मनसे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देवून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणीचे निवेदन दिले.

वणी उपविभागात गेल्या 20 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अपर वर्धा, निम्न वर्धा व बेंबला धरणातून वर्धानदी पत्रात विसर्ग करण्यात आलेल्या पाण्याचा फटका वणी, मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याच्या अपुऱ्या व निकृष्ठ कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून जमीन खरडून गेली आहे. वणी विभागात वेकोलिच्या गलथान कारभारामुळे अनेक गावांची परिस्थिती बिकट झालेली आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळवून द्यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, मारेगाव तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, राळेगाव तालुकाध्यक्ष शंकर वरघट, शहराध्यक्ष अमीत बदनोरे, शुभम भोयर, सुरेश लांडे, प्रवीण बोथले, राहुल आत्राम, देविदास बुटे, प्रशांत बुटे, रामाजी ठावरी, वसंता बोधाने, राकेश धानोरकर आदी शेतकरी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.