रस्त्यावर भजी तळून काँग्रेसचे महागाई विरोधात अनोखे आंदोलन

महागाई, जीएसटी विरोधात काँग्रेसचा एल्गार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महागाई व जीएसटी विरोधात आज काँग्रेसने जोरदार देशव्यापी आंदोलन केले. वणी विधानसभा क्षेत्रातही हे आंदोलन जोशात करण्यात आले. वणीमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांनी महागाई, जीएसटी व ईडीविरोधात निषेध व्यक्त करीत निवेदन सादर केले. झरी तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या ‘भजी तळा’ आंदोलनाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले. यावेळी आशिष खुलसंगे, राजू कासावार यांनी भजी तळून महागाई, जीएसटी विरोधात आपला रोष व्यक्त केला. 

सध्या सिलिंडर, गॅस, पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. त्यातच केंद्र सरकारने विविध अत्यावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने अनेकांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. याविधात झरी तालुका काँग्रेस कमिटीद्वारा तहसिल कार्यालयासमोर अनोखे भजी तळा आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर भजी तळून व जोरदार घोषणाबाजी करत यावेळी केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.

अन्नधान्यावर कर लावणारे हे पहिले सरकार – आशिष खुलसंगे
पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, यांच्यासह स्टील, सिमेंटच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. हे कमी म्हणून कि काय आता केंद्रातील भाजपा सरकारने विविध जीवनावश्यक वस्तूंच्या नंतर आता अन्नधान्यावरही पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्यांनी जगावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर भजी तळून भाजप सरकारचा निषेध करीत आहो.
– आशिष खुलसंगे, तालुका अध्यक्ष काँग्रेस, झरी

निवेदन देताना पदाधिकारी व कार्यकर्ते

झरी येथील आंदोनलात आशिष कुलसंगे, राजू कासावार, संदीप बुरेवार, सभापती, नीलेश येल्टीवार, राहुल दांडेकर, हरीदास गुर्जरवार, सुरेंद्र गेडाम, प्रकाश कासावार, भोमारेड्डी येनपोत्तुलवार, गणेश बेलेकर, प्रतिक गणरतवार, राकेश डालेवार, प्रज्योत एनपोतवार, निखिल चौधरी, श्रीकांत अनमुलवार, प्रणय दर्शनवार, शंकर आकुलवार, गंगाधर आत्राम, प्रदीप टेकाम, चेतन मॅकलवार यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेस व सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.