पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील शासकीय मैदानात पोळा उत्सव समितीतर्फे पोळा साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गण, पोवाडा आणि झडती याने उत्सवात रंगत आणली. यावेळी मोठ्या प्रमाणात वणीकर उपस्थित होते.
संध्याकाळी 5.30 वाजता शासकीय मैदानावर पोळा उत्सवाला सुरुवात झाली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, राजाभाऊ पाथ्रडकर, रवि बेलुरकर, प्रमोद निकुरे, श्रीकांत पोटदुखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शेतक-यांनी बैलांना सजवून आणले होते. मान्यवरांच्या हस्ते बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी शेतक-यांचा टोपी, दुपट्टा आणि नारळ देऊन सन्मान करण्यात आला. पूजेनंतर शेतक-यांना भोजारा देण्यात आला.
उत्सव समिती तर्फे मैदान तोरण लावून सजवण्यात आले होते. यावेळी लोककलावंत वासूमामा यांनी गण व पोवाडा गायला. तसेच शेतक-यांनी पोळ्यांची विशेषता असलेल्या झडत्या गायल्या. एक नमन गौरा पार्वती, हरबोला हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला. बळीराजा सुखी राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी प्रतिज्ञा उपस्थितांतर्फे घेण्यात आली.
पोळा उत्सव समितीचे नितीन शिरभाते यांच्या मार्गदर्शनात अमित उपाध्ये, विकेश पानघाटे, अमर चौधरी, सागर मुने, रवि धुळे, सुरेंद्र नालमवार, विकास देवतळे, सृजन गौरकार, सागर जाधव, प्रमोद माटे, रोहन शिरभाते, आशिष पावडे, राहुल खारकर, शरद खोंड, परितोष पानट, किसन कोरडे, वैभव डंभारे, अक्षय देठे, वैभव मेहता यांच्यासह पोळा उत्सव समितीच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.