Breaking News: विस्फोटक वाहून नेणाऱ्या वाहनाला अपघात, एक ठार

सुदैवाने मोठी घटना टळली, मुकूटबन रोडवरील घटना

जितेंद्र कोठारी, वणी :  खाणीमध्ये बलास्टिंगसाठी विस्फोटक वाहतूक करणाऱ्या वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना रविवार दुपारी 3 वाजता दरम्यान वणी मुकूटबन मार्गावर मानकी गावाजवळ घडली. चरणदास पांडुरंग ठेंगणे (55) रा. मानकी ता. वणी असे या अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर विस्फोटक वाहतूक करणारी पिकअप व्हॅन रस्त्याच्या बाजूला खाईमध्ये पलटी झाली.   

प्राप्त माहितीनुसार मानकी येथील शेतकरी चरणदास ठेंगणे दुपारी 2.45 वाजता आपल्या होंडा पेशन दुचाकी क्रमांक (MH29W5040) ने कामानिमित्त वणीकडे निघाले होते. घरून निघताना त्यांनी आपल्या मुलाला शेतात जाण्यासाठी मानकी बस स्टँड पर्यन्त दुचाकीवर सोडूले. मानकी बसस्टँड पासून अर्ध्या किलोमीटर समोर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या विस्फोटक वाहतूक करणाऱ्या  पिकअप क्र. (MH31V6844) या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकल व चरणदास ठेंगणे रस्त्यापासून 20 फुट दूर फेकले गेले. यात् चरणदास ठेंगणे यांच्या डोक्याला मार लागून ते जागीच गतप्राण झाले.

मोटरसायकल धडक देऊन पिकअप वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला खाईमध्ये पलटी झाले.  पिकअप वाहनचा चालक पलटी झालेल्या पिकअपचा इंजिन चालू अवस्थेत सोडून घटनास्थळावरुन फरार झाला.  माहिती मिळताच मृतकाच्या कुटुंबियांसाह गावकरी घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती वणी पोलिसाना देण्यात आली असून बातमी लीहेपर्यंत पंचनाम्याची कारवाई सुरु होती.

Comments are closed.