वणी (सुनील बोर्डे):- वणी येथील जैन आउट मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिकांच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
जैन ले आउट मधील हनुमान मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात १६ डिसेंबरला सकाळी ५.३० वाजता घटस्थापना नंतर शंकर किनाके यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक ध्यान, तालुका प्रचारक मारोती ठेंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामधून, सकाळी १० वाजता महिला मेळाव्यात ग्रामगीताचार्य विध्याताई जुनगरी, ताई दहेकर मार्गदर्शन करणार आहे.११वा. रांगोळी स्पर्धा,१२वा. गुरुदेव भूषण पुरस्कार आणि सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा होणार आहे.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी लो.टी. महाविद्यालयाचे प्रा.विजय वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.भाऊ अडगते,मनीषा टोंगे,ताई रोगे उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ४ वा. भजन, मौन श्रद्धांजली व ग्रामगीताचार्य भाऊ नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक प्रार्थना होणार आहे. सायंकाळी ७ वा. सावंगी (राळेगाव) येथील राष्ट्रीय कीर्तनकार गजानन सुरकर यांचे कीर्तन होणार आहे.
१७ डिसेंबरला सकाळी सामुदायिक ध्यान, ग्रामगीता वाचन आणि १० ते २ वाजेदरम्यान गुरुदेव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरचे जिल्हा सेवाधिकारी रुपलाल कावडे राहतील. तर ‘लेक वाचवा लेक शिकवा’ या विषयावर लायन्स इंग्लिश मीडीअम स्कूलचे लिचोडे गुरुजी प्रमुख वक्ते आहे. राजुरा(चंद्रपूर) येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस झहीर रसीद खान ‘गुरूदेव साहित्य परिचय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. मारेगावचे कपिल शृंगारे उपस्थित राहणार आहे.
१७ ते २४ डिसेंबर दरम्यान आर्वी (वर्धा) येथील रामेशपंत आखरे महाराज यांच्या श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान प्रवचन होणार आहे. २३ ला पालखी सोहळ्याचे व २४ डिसेंबरला दहीहंडी व काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. परिसरातील लोकांनी लाभ घेण्याची विनंती मंडळाने केली आहे. यशस्वीतेसाठी जैन ले आऊट मधील मंडळी परिश्रम घेत आहे.