मार्डी गणात काँग्रेसचा गढ़ कायम

धनराज कुमरे यांचा दणदणीत विजय

0

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील मार्डी पंचायत समिति गणाकरिता झालेल्या निवडणुकीत अखेर काँग्रेस पक्षाने आपला गड कायम ठेवला असून नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत धनराज हरीभाऊ कुमरे हे 923 मतानी विजय झाले आहे.

यापूर्वी परिसरातील श्रीकृष्ण कुमरे मार्डी पं.स.गणातुन सर्वाधिक मतानी विजय झाले होते. मात्र जवळपास 4 महिन्याच्या कालावधी नंतर त्यांचे निधन झाले. त्यामुळे या गणासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. पं.स. गणकरिता 13 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्याचा 14 डिसेंबर रोजी निकाला लागला. यात काँग्रेसचे धनराज कुमरे विजयी झाले.

 

शिवसेनेचे उमेदवार गजानन मारोती मेश्राम यांना एकूण झालेल्या 8250 मतदाना पैकी 2957 मते तर भाजप चे नाना मारोती कुळमेथे यांना 1270 मते पडली तर काँग्रेसचे धनराज कुमरे यांना 3880 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा 923 मतांनी पराभव केला.

 

ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय साळवे,सा.नि.निर्णय अधिकारी सुनील तलवारे यांच्या नियंत्रणात शांततेत पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.