दारूबंदीसाठी झरी तालुक्यातून जाणार स्वाक्षरी असलेल्या फाटक्या साड्या
तालुक्यातील 40 गावात होणार सभा व रॅली
रफीक कनोजे, झरी: स्वामिनी संघटना यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी करण्याकरिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे. यात झरीमधील 40 गावातुन महिलां मार्फत स्वाक्षरी असलेल्या साड्या पाठवून महिला आपल्या दारूमुळे उध्वस्त झालेल्या संसाराची व्यस्था मांडणार आहे. या अनोखा आंदोलनातून त्या दारूबंदी जिल्ह्यासाठी किती आवश्यक आहे याची प्रचिती राज्य शासनाला करून देतील.
स्वामिनी संघटनेकडून यवतमाळ जिल्हा दारूबंदी बाबत समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांचे शिबिर देखील आयोजित करण्यात आले. याची सुरुवात रविवारी करण्यात आली, यात मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी विध्यार्थ्यांना संबोधन केले. यात विध्यार्थ्यांना दारूबंदी हि सामाजिक दृष्टीने किती आवश्याक आहे या बाबत मान्यवारांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना येथे दारुमुळे समाजात काय दुष्परिणाम झाले आहे हे अनुभविण्यासाठी त्यांना तालुक्यातील गावात पाठविण्यात आले. यात या विद्यार्थ्यांन मार्फत गावात जनजागृती हि करण्यास सुरवात झाली. तसेच गावागावात जनजागृती रॅली ही काढण्यात येणार आहे. गावातील नागरिकांकडून जिल्ह्याची दारूबंदीसाठी लोकांचे मत जाणून घेण्याकरिता फाटक्या साडी वर स्वाक्षऱ्या मोहीम घेण्यात येणार आहे. दोन दिवस तालुक्यात नागरिकांशी प्रत्यक्ष स्वरूपात दारूबंदी बाबद संवाद साधून यानंतर विध्यार्थी या प्रत्येक गावातून महिलांना एकत्रित करून 19 तारखेला दारूबंदी मोर्च्यासाठी नागपूर कडे रवाना होतील तसेच त्यांना मोर्च्या च्या ठिकाणी पोहचवतील.
यावेळी तालुक्यात संघटक म्हणून राम आईटवार, झिबल भोयर,प्रतिभा लेनगुरे, ताई मेश्राम, शोभा गडेवार,विजया अक्कलवार, विशाल धुळे, आशुतोष चौधरी जबाबदारी पाहतील. या वेळी तालुक्यातून या मोर्च्यात जास्तीतजास्त लोकांनी सहभागी होण्याचे आव्हाहन संयोजकामार्फत करण्यात आले आहे.
याबाबत या आदोलनाचे संघटक राम आईटवार वणी बहुगुणीशी प्रतिक्रिया देताना म्हणाले की….
झरीतालुका हा आदिवासी बहुल आहे. येथे व्यसनाचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. म्हणून तालुक्यातील जनतेने जास्तीतजास्त संख्येत या लढ्यात शामिल व्हावे. राम आइटवार, पाटण — दारुबंदी संघटक झरी