जागतिक दिव्यांग दिनानिमित्त वणीत विविध कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: जागतिक दिव्यांग दिना निमित्त वणीत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. छत्रपती शिवाजी चौक येथे झालेल्या कार्यक्रमात जनजागरण घेण्यात आला. कार्यक्रमाची उपस्थित मान्यवर व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर, लुईस ब्रेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी एपीआय माया चाटसे, सामाजिक कार्यकर्ते व रामदेवबाबा मुकबधिक विद्यालयाचे संस्थापक मेघराज भंडारी, सुरेश लोढा, सामाजिक कार्यकर्ते गीत घोष यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज भंडारी यांनी केले तर सूत्रसंचालक महेश लिपटे यांनी केले. यावेळी सपना वासेकर यांनी दिव्यांगाच्या 21 प्रवर्गा विषयी माहिती देत शासनाच्या विविध सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. मेघराज भंडारी यांनी आयुष्यात यशस्वी झालेल्या दिव्यांग व्यक्तींचा दाखला आणि उदाहरण देत दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधीबाबत माहिती दिली. श्री रामदेवबाबा मूकबधिर विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी ज्ञानेश्वर मोड़क यांनी मनोगत व्यक्त करताना दिव्यांग व्यक्तींचे जीवन आणि भावना विषद केल्या. दरम्यान विशेष शिक्षिका चित्रलेखा लारोकर यांनी सांकेतिक भाषेत मूकबधिर विद्यार्थी यांना कार्यक्रमाचे धावते वर्णन केले. हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.

पोहणा जि.प शाळेच्या शिक्षिका कु. ढाले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गट संसाधन केंद्र पंचायत समिती वणीचे निकोले, नितेश बावणे, प्रकाश नागतुरे, देवराव चिडे, साखरकर, आसुटकर, रामटेके, सर्व साधन व्यक्ती व साधन शिक्षक व रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय चिखलगाव येथील शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास दिव्यांग आजी माजी विद्यार्थी, पालक वर्ग यांच्यासह वणीतील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जागतिक दिव्यांग दिन (World Day of Persons with Disabilities) दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये, ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन 1992 पासून जागतिक दिव्यांग दिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक ‘दिव्यांग दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जागतिक दिव्यांग दिनाच्या (World Day of Persons with Disabilities ) निमित्ताने दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत (समाजामध्ये) जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी दिव्यांगांच्या प्रति, सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उध्दारासाठी मदत मिळावी. म्हणून या दिवसा साजरा केला जातो.

Comments are closed.