न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट ग्राहकांच्या सेवेत

खवय्यांसाठी नवनवीन डिशची मेजवानी, रोज असणार 'टुडेज स्पेशल' डिश.... अधिक माहितीसाठी संपर्क: 7972485021, 9423001116

बहुगुणी डेस्क, वणी: खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच वणीतील साई मंदिर चौक येथे न्यू रसोई (प्युर वेज) हे लक्झरी रेस्टॉरन्ट सुरू झाले आहेत. पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, कॉन्टिनेन्टल, चायनिज सह इथे अनेक वेगवेगळ्या डिश ग्राहकांना इथे उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेष म्हणजे सकाळी 7 वाजेपासून हे रेस्टॉरन्ट सुरू होणार असून सकाळी 7 वाजतापासून ग्राहकांना विविध साऊथ इंडियन डिशेसचा आनंद घेता येणार आहे. खवय्यांनी एकदा या रेस्टॉरन्टला भेट द्यावी असे आवाहन रसोई रेस्टॉरन्टच्या संचालकाद्वारे करण्यात आले आहे.

Podar School 2025

वणी शहरात चांगलेच मुरलेले खवय्ये आहे. शिवाय पारंपरिक डिश सोडल्या तर त्यापेक्षा अधिक आणि नवीन डिश शहरात उपलब्ध नाही. स्पेशल शेफ उपलब्ध नसणे किंवा अप्रशिक्षित शेफ यामुळे नवीन डिश व टेस्ट खवय्याना मिळत नाही. फक्त चांगल्या टेस्टसाठी आणि नवीन डिशसाठी खवय्ये वणीतून चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद येथे जावे लागते. खवय्यांची ही गरज लक्षात घेऊन न्यू रसोई रेस्टॉरन्टमध्ये विविध नवनवीन डिश ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चांगली टेस्ट आणि नवीन डिशसाठी वणीकरांसाठी इतर ठिकाणी जाण्याचा वेळ तर वाचणार आहे शिवाय पैशाची बचत देखील होत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रोज राहणार एक स्पेशल डिश
न्यू रसोई रेस्टॉरन्टमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन डिश, कॉन्टीनेन्टल, चायनीय, साउथ इंडियन डिश उपलब्ध आहेत. याशिवाय देश विदेशातील अधिकाधिक डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध प्रदेशातील डिशसाठी स्पेशल शेफ इथे उपलब्ध आहेत. याशिवाय तंदुरच्या विविध डिश आणि चाटचे विविध प्रकारही येथे ग्राहकांना चाखायला मिळणार आहे. विशेष म्हणजे रसोई मध्ये ‘टुडेज स्पेशल’ देखील सुरू करण्यात आले असून याद्वारे खवय्यांना रोज एक स्पेशल डिशचा आनंद घेता येणार आहे.

टेक अवे सेवा उपलब्ध
न्यू रसोई रेस्टॉरन्टमध्ये टेक अवे सेवा देखील सुरू आहे. यासाठी ग्राहकांना फोनद्वारा आपली ऑर्डर द्यावी लागले. ऑर्डरनंतर काही वेळातच ग्राहकांना ती डिश मिळणार आहे. या सेवेसाठी कुठलाही अतिरिक्त चार्ज नसून रेस्टॉरन्टमधल्या रेटमध्येच ग्राहकांना डिश उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिवाय लवकरच होम डिलेव्हरी सेवा देखील सुरू होणार आहे.

शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक अविनाश व उमेश यांनी केली आहे.
पत्ता: न्यू रसोई (प्युर वेज) रेस्टॉरन्ट  
पहिला माळा, इक्विटस बँक बिल्डिंग, साई मंदिर चौक, नांदेपेरा रोड वणी,
वेळ – सकाळी 7 ते रात्री 11, साउथ इंडियन डिश वेळ – स. 7 ते सं. 6 वाजेपर्यत
अधिक माहितीसाठी संपर्क: 7972485021, 9423001116

Comments are closed.