ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय महिलांसाठी डोकेदुखी

कायर येथे मटका, जुगार, देशीदारुची राजरोसपणे विक्री

0

रफीक कनोजे, झरी: मागील दोन महिन्यांपासुन शिरपूर पोलीस ठाणे अंतर्गत कायर  बिटमधील पुरड, गोडगाव (ईजासन) व कायर ह्या गावात अवैध देशी दारूची खुल्लेआम विक्री सुरु आहे. पण स्थानीय पोलीसांची मुक सहमती असल्यामुळे यवतमाळ एलसीबी व वणी डीबी पथक सुद्धा निष्क्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. पोलिसांच्या कार्यप्रणाली मुळे महिलांची डोकेदुखी वाढत आहे.

शिरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत कायर येथे कोणत्याही प्रकारचे देशी दारु व बीअरचा परवाना नसताना देशी दारु विक्री व मटका जुगार सुरू होता. त्यामुळे त्रस्त होउन १८ ऑगस्ट ला कायर येथील महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वणी विजय लगारे व शिरपुरचे ठाणेदार सागर इंगोले यांना निवेदनाद्वारे सात दिवसाच्या आत दारुबंदी न झाल्यास उपोषणाला बसु असा इशारा दिला होता. ठाणेदार सागर इंगोले यांनी कायर येथील प्रफुल्ल गणेश शंकावार,  गणेश पुरूषोत्तम  शंकावार, कैलास राजेश्वर येनगंटीवार व पुरड येथील कवडु टिकले ह्या दारू विक्रेत्यांवर मुद्देमाल पकडुन मंगला विजय गुरनुले , योगिता गंधशीरवार , वर्षां येलपुलवार, इंदु शंकर कावड़े, कल्पना उदे, अमिना याकुब  पठाण, गिता सकीनलावार ह्या महिलाच्या पंचनाम्यावर सह्या घेवुन दिवाळी पर्यंत दोन महीने मटका व दारु विक्री बंद केली.

पण ही बंदी काही दिवसच ठरली. सोन्याची अंडी देणार्या कोंबडीला कापतो कोण? ह्या म्हणीप्रमाणे कायर परीसरात दिवाळीनंतर  दोन  महिन्यांपासुन चारही इसम पोलीसांच्या मुकसहमतीने जोमाने देशीदारू  विक्री करीत आहे. कायर बीट मधे आजमितीला पुरड, गोडगाव (इजासन), व कायर येथे  १२  ते १५ दारू विकणारे आहे. ज्या महिलांनी पुढाकार घेऊन व पोलिसाना मदत करून देशी दारु पकडुन दिली तर ह्या महीलानाच जाणूनबुजून साक्षदार बनवले जाते. पोलीसाद्वारे पंचनाम्यावर महिलांच्या सह्या घेतल्या जातात जेनेकरुन महिला न्यायालयात तारखावर जाउन त्रस्त व्हाव्या व भविष्यात महिलानी आंदोलन करु नये.

ह्या कार्यप्रणाली मुळे महिला हतबल झाल्या आहेत. महिलानी संपूर्ण अवैध धंद्याचे उच्चाटन केले त्या महिला सुद्धा पोलीसाकडुन निराश झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दारुबंदीचा निर्णय महीलांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ठाणेदार कडुन अपेक्षा
मुकूटबन येथील ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी १६ लोकाना तडीपार केले. वाघ यांचा आदर्श घेऊन ठाणेदार सागर इंगोले यांनी कायर बीट मधे ज्या व्यक्तीवर  तीन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे अश्या अवैध धंदेवाइकाना  तडीपार करावे. कायर हे गाव दत्तक घेवुन दारु व मटका बंद करुन व्यसनमुक्त करावे व भविष्यात मटका, दारु विक्री होणार  नाही ह्याची दक्षता घ्यावी अशी मांगणी कायर येथील महीला करीत आहे. असे न झाल्यास महिला कोनतीही पुर्व सूचना न देता आंदोलन करु असा ईशारा महिलांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.