विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना सलग 6 व्यांदा MDRT बहुमान
LIC कार्यालयात करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सत्कार
सुनील ठाकरे, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ते योगेश पोद्दार यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा MDRT हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे या आधी त्यांना 5 वेळा हा बहुमान मिळाला असून सलग 6 वेळा हा बहुमान निळवण्याची किमयाही त्यांनी केली आहे. त्यांच्या या कार्याबाबत LIC च्या वणी कार्यालयामध्ये त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
आवश्यक व्यवसाय केलेल्या विमा अभिकर्त्याला MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) चा बहुमान मिळतो. या राउंड टेबल कॉन्फरंससाठी जगभरातील विमा एजेंट्स सहभागी होतात. जगातील विविध देशातील मोठ्या शहरात हे सेमिनार होतात. या जागतिक संमेलनात सहभागी होण्याची संधी योगेश पोद्दार यांना मिळाली आहे.
MDRT हा बहुमान मिळण्यासाठी वर्षभरासाठी एक टारगेट दिले जाते. यावर्षी कोरोनाच्या भीतीदायक वातावरणात संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर आहे. मात्र अशा गंभीर काळातही योगेश पोद्दार यांनी हे टारगेट पूर्ण केले हे विशेष आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल अमरावती विभागाचे प्रमुख SDM मल्लिक व अमरावती विभागाचे विक्रीय विभागाचे प्रमुख MS धोंगडे यांनी वणी शाखेमध्ये येऊन सन्मानपत्र देऊन सन्मान केला. सोबत शाखाधिकारी प्रकाश झलके, विकास अधिकारी हेमंतकुमार टिपले आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
LIC च्या विविध पॉलिसीच्या माहितीसाठी संपर्क:
योगेश पोद्दार (MDRT) – 9881754963 (व्हॉट्सअपसाठी येथे क्लिक करा)
Comments are closed.