एस. टी. बसची दुचाकीला धडक, वणी येथील युवक ठार

वणी वरोरा मार्गावर पाटाळा पुलाजवळ भीषण अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा कडून वणीच्या दिशेने येणारी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील वणी येथील युवक जागीच ठार झाला. संजय पिंपलकर रा. जैन लेआऊट वणी असे मृत युवकाचा नाव आहे. 

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार संजय पिंपळकर काही कामानिमित्त सोमवार 9 जानेवारी रोजी आपल्या दुचाकीने वरोराकडे जात होता. दरम्यान दुपारी 4 वाजता सुमारास वर्धा नदीवरील पुलाच्या पलीकडे माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुचाकीला समोरून येणारी एस. टी. बस क्रमांक MH07C9375 च्या चालकाने निष्काळीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या अपघातात दुचाकीस्वार संजय पिंपळकर याच्या डोक्याला मार लागून जागीच गतप्राण झाला. दुर्घटनेनंतर मृत युवकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास माजरी पोलीस करीत आहे.

Comments are closed.