निळापूर येथे पार पडली राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

59 मंडळाचा सहभाग, 3 लाखांची पारितोषीक... 'हे' मंडळ ठरले अव्वल...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील निळापूर (ब्राह्मणी) येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा रंगली. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या तीन दिवसात रंगलेल्या स्पर्धेत राज्यभरातील एकूण 59 भजन मंडळ सहभागी झाले होते. 5 गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 54 व्या पुन्यतिथी पर्वावर ही भजन स्पर्धा घेण्यात आली. गुरुदेव सेवा महिला मंडळ निळापूर व निळापूर ग्रामवासी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 3 लाखांचे बक्षिस या स्पर्धेत होते.

शुक्रवारी दिनांक 6 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे व जिल्हा सेवा अधिकारी पद्माकर ठाकरे, आर्मी सेवा अधिकारी दत्ता मार्कंडी व पूजा अनिल बोढाले यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर स्थानिक महिला मंडळाच्या भजनाने स्पर्धेला सुरूवात झाली.

या स्पर्धेत शहरी गटात सार्थक गुरुदेव सेवा मंडळ हस्तापूर, अमरावती यांना प्रथम तर राष्ट्रसंत गुरुदेव सेवा भजन मंडळ जुनोना, वाशिम यांना द्वितीय तर आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ निमगव्हान, अमरावती यांना तृतिय पारितोषीक मिळाले. शहरी महिला गटात संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर, चंद्रपूर, जिजाऊ महिला भजन मंडळ नेहरू नगर, चंद्रपूर व महिला गुरुदेव सेवा भजन मंडळ जैतापूर, कोरपना हे मंडळ अनुक्रमे पहिले, दुसरे व तिसरे ठरले.

ग्रामीण भाग गटात गुरुदेव सेवा मंडळ बोरगाव (मेघे) वर्धा प्रथम, अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजनी मंडळ विदोरा, यवतमाळ द्वितीय, तर गुरुदेव सेवा मंडळ पिवरडोल ता. झरी तृतीय ठरले. ग्रामीण महिला गटात मंजूळामाता महिला भजन मंडळ, मुर्धोनी प्रथम, मंजुळामाता महिला भजन मंडळ, गणेशपूर दुसरे तर दत्तकृपा महिला भजन मंडळ नायगाव खुर्द यांनी तृतिय क्रमांक प्राप्त केला. तर बाल गटात गुरुदेव बाल भजन मंडळ – कनकी, नांदेड प्रथम, मानवसेवा शास्त्रालय बाल भजन मंडळ, गुरुकुंज मोझरी द्वितीय तर गुरुदेव बालिका भजन मंडळ, राईत, अकोला तिसरे ठरले.

स्पर्धेचे परीक्षण प्रमोद पोकळे, गणेश निनावे व रश्मी भाटी यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाला विजय पिदूरकर, बंडू चांदेकर, टिकाराम खाडे, संजय खाडे यांच्यासह निळापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निळापूर ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.