अडेगाव येथे नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर
रफीक कनोजे, झरी: गुरुवारी अडेगाव येथे नेत्रतपासणी, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रक्तदान महादान फोउंडेशन व समता फोउंडेशन मुंबई यांच्या सौजन्यातून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 300 जणांची तपासणी करण्यात आली. तर 60 रुग्णांवर लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.चव्हाण, अध्यक्ष मंगेश पाचभाई व गणेश पेटकर, बबन पारखी, धनंजय पाचभाई, प्रीतम लोढा, गणेश पारखी, दिगंबर पाचभाई, आकाश गोचे, खुशाल पारखी व समस्त अडेगाव ग्रामवासीयांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.
गणेशपूर येथे रक्तदान शिबिर
गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूर तर्फे संत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त रक्तदान महादान फोउंडेशन तर्फे व श्री. साईनाथ ब्लड बँक अँड कंपोनेंट , नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला गुरुदेव सेवा मंडळ अमोल आसुटकर, सरपंच रत्नमालाताई बरडे, तंटामुक्ती समिती उपाध्यक्ष मिलिंद वाघमारे, मंगेश पाचभाई, गणेश पेटकर, राहुल आसुटकर, तुकाराम कुलसंगे, मंगेश बरडे, संतोष बरडे, प्रभाकर असुटकर व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.