यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

बहुगुणी डेस्क, वणी: घरची परिस्थिती जेमतेम, शिक्षणही यथातथाच, मात्र आयुष्यात काही करण्याची जिद्द असली आणि त्याला परिश्रमाची जोड मिळाली तर शुन्यातूनही विश्व निर्माण करता येऊ शकतं. हे आपल्या कृतीतून दाखवणारे परिसरातील एक यशस्वी उद्योजक म्हणजे राजू मधूकर किन्हेकर… परिसरात शेतीपयोगी लागणा-या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी सर्व प्रथम नाव घेतले जाते ते RN एन्टरप्राईजेसचे. या फर्मचे राजू किन्हेकर हे को फाउंडर असून आज सोलर सिस्टम विक्रीत RN एन्टरप्राईजेसने संपूर्ण परिसरात उच्चांक गाठला आहे. गेल्या 10 वर्षांत 12 हजारांपेक्षाही अधिक ग्राहकांचा, शेतक-यांचा विश्वास त्यांनी संपादीत केला आहे. आज राजू किन्हेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त हा व्यक्तिविशेष लेख. वाढदिवसानिमित्त RN एन्टप्राईजेसमध्ये कोणत्याही सोलर झटका मशिनच्या खरेदीवर 5 किलो क्लच वायर मोफत दिला जात आहे. ही ऑफर केवळ एका आठवड्यासाठी असून 15 मार्च पर्यंत शेतक-यांना याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आरएन सोलर सिस्टमद्वारा (वरोरा रोड, पालिका कॉम्प्लेस, MCED च्या बाजूला) करण्यात आले आहे.

राजू मधूकर किन्हेकर यांचा यांचा 9 मार्च 1979 रोजी पुनवट येथे जन्म झाला. त्यांचे वडिल हे शेतमजुरी करायचे. राजू यांनी त्यांची शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वणीतून 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणापेक्षा त्यांचा इलेक्ट्रॉनिक्समध्ये अधिक रस होता. लहानपणापासूनच त्यांना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्त करण्याचा छंद होता. आवडीचे काम करण्यासाठी आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला हातभार लागावा यासाठी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला व गावातच व्यवसाय टाकण्याचे ठरवले. सुरवातीला त्यांनी पुनवट येथे टीव्ही, टेपरेकॉर्डर, सीडी व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुरुस्तीचे दुकान टाकले.

अचूक निदान, वाजवी दर, सर्विस यामुळे रिपेअरिंगच्या क्षेत्रात त्यांनी परिसरात चांगला जम बसवला. मात्र केवळ एवढ्यावरच समाधान न मानता आणखी काही मोठे करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी 10 वर्षांआधी त्यांच्या मित्रासोबत (निकेश निब्रड) आरएन एनटरप्राईजेस या पार्टनरशिप फर्मची स्थापना केली. वरोरा रोड, वणी (MCED च्या बाजूला) येथील नगर पालिकेच्या गाळ्यामध्ये त्यांनी स्टोअर व कार्यालय सुरू केले. त्यांनी शेतक-यांसाठी लागणा-या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीची सुरूवात केली. राजू यांचा इलेक्ट्रॉनिक्स व रिपेअरिंग क्षेत्रातील अनुभव या व्यवसायात चांगलाच कामात आला.

वाजवी दर, उत्कृष्ट सर्विस, दर्जेदार प्रॉडक्ट यामुळे लवकरच त्यांनी परिसरातील शेतक-यांचा विश्वास संपादन केला. माउथ पब्लिसिटीने त्यांच्या प्रॉडक्टची मोफत प्रसिद्धी झाली. शेतीसाठी लागणारी झटका मशिन या प्रॉ़डक्टने विक्रीचा उच्चांक गाठला. सोबतच तूर कटर मशिन, टॉर्च, डॉग बार्किंग मशिन इत्यादी अनेक शेतीपयोगी वस्तू शेतकरी वापरत आहेत. अल्पावधीतच एक यशस्वी व्यावसायिक व उद्योजक म्हणून राजू किन्हेकर यांनी परिसरात आपली ओळख निर्माण केली. (राजू किन्हेकर – मो. 8999124806)

(आपलीही काही यशोगाथा असल्यास 9096133400 (संपादक) या क्रमांकावर संपर्क साधावा..)

सोलर झटका मशिन खरेदीवर 5 किलो क्लच वायर मोफत
RN एन्टरप्राईजेसचे को फाउंडर राजू किन्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त झटका मशिनच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. कोणत्याही सोलर झटका मशिनवर 5 किलो क्लच वायर अगदी मोफत दिला जात आहे. ही सुट केवळ एका आठवड्यासाठी आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरएन एन्टरप्राईजेसमध्ये 1 एकर ते 50 एकर पर्यंतची सोलर मशिन उपलब्ध आहेत.

50 व 15 एकरसाठीच्या मशिनचे वैशिष्ट्ये
दोन्ही मशिन ही झटका मशिनमध्ये सुप्रसिद्ध असलेल्या Z + सुरक्षा या ब्रँडची आहे. 50 एकरच्या मशिनमध्ये 26 AH 12 वोल्टची बॅटरी आहे. 40 वॅटची प्लेट यात आहे. तर 15 एकरसाठीच्या मशिनमध्ये 12 AH 12 व्होल्टची बॅटरी आहे. तर 20 वॅटची सोलर प्लेट आहे. दोन्ही बॅटरीसोबत अर्थिंग तार, अर्थिंग प्लेट, कनेक्शन वायर, 100 इन्सुलेटर आहे. विशेष म्हणजे ही मशिन थेट उत्पादकांकडून कडून ग्राहकांना दिली जाते त्यामुळे अतिशय वाजवी दरात ग्राहकांना ही मशिन खरेदी करता येणार आहे.

आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी वणीतील वरोरा रोडवरील R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये Z+ सुरक्षा कंपनीची कुंपणासाठी सोलर झटका बॅटरी मशिन उपलब्ध आहे. 

Comments are closed.