वर्ग 4 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास
बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. याशिवाय अनेकांना इंग्रजी वाचता येते, कळते मात्र बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा उन्हाळा शिकण्याची चांगली संधी घेऊन येत आहे. गुरुनगर येथील प्रा. सागर जाधव यांच्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये 1 महिन्याचा स्पोकन इंग्लिश क्लास सुरू होणार आहे. या क्लासमध्ये वर्ग 4 ते 10 वी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. सदर क्लास हा 15 एप्रिल ते 15 मे पर्यंत चालणार आहे. या क्लासची एक बॅच ही छोरिया ले आऊट येथे तर दुसरी बॅच ही गुरुनगर येथे होणार आहे. जो परिसर विद्यार्थ्यांना क्लाससाठी सोयिस्कर होणार त्या ठिकाणी त्यांना प्रवेश घेता येणार आहे. या क्लाससाठी अवघ्या काही जागा शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर 7038204209 या क्रमांकावर संपर्क साधून किंवा जाधव कोचिंग क्लास येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन जाधव कोचिंग क्लासेस तर्फे करण्यात आले आहे.
या कोर्समध्ये काय शिकता येणार?
सदर कोर्च हा चार लेव्हलमध्ये होणार आहे. पहिली लेव्हल ही बिगिनर्स लेव्हल आहे. यात इंग्रजी बोलण्याआधी असलेल्या सर्व ट्रिक्स क्लिअर केल्या जाणार आहे. दुसरी लेव्हल ही बेसिक लेव्हल आहेत. यात स्पोकन इंग्लिशसाठी आवश्यक असणारे बेसिक शिकवले जाणार आहे. तिसरी लेव्हल की इंटरमीडिएट लेव्हल यात नेहमी बोलले जाणारे इंग्रजी वाक्य व इंग्रजी बोलण्यात होणा-या चुका दुरुस्त केल्या जाणार आहे. शेवटची लेव्हल ही ऍडव्हान्स लेव्हल असून यात विविध ठिकाणी गेल्यावर इंग्लिश कशी बोलावी यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
स्पोकन इंग्लिशची संपूर्ण तयारी – प्रा. सागर जाधव
विद्यार्थी अनेक वर्ष इंग्रजी शिकत असतो. मात्र त्यातून तो केवळ इंग्रजी वाचू शकतो किंवा लिहिलेले समजू शकतो. अनेक वेळा इंग्रजी बोलण्याची गरज असते. अशा वेळी इंग्रजी येऊनही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी पडतो. इंग्रजी बोलण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या आत्मसाद केल्या की इंग्रजी बोलणे सोप्पे होते. याच ट्रिक्स आम्ही एक महिन्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये शिकवल्या जाणार आहे.
– प्रा. सागर जाधव, (M.A. Eng, Eco, B.ed) संचालक, जाधव कोचिंग क्लासेस
क्लासमध्ये केवळ मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. आवश्यक त्या सीट पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन जाधव कोचिंग क्लास तर्फे करण्यात आले आहे.
पत्ता: जाधव कोचिंग क्लासेस
१) गुरुनगर, एलटी कॉलेज रोड वणी २) छोरिया ले आऊट, वणी
अधिक माहिती साठी संपर्क : 7038204209
Comments are closed.