कोसारा येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन
रफिक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील कोसारा येथे दरवर्षी प्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह घेण्यात आला. पारायण सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी तरुण युवक व्यसनांपासून दूर राहून ज्ञानी बनावे, पुस्तकातून उपयुक्त माहिती मिळावी ह्या उद्देशाने गावात कर्मयोगी तुकाराम दादा सार्वजनिक वाचनालयचे उदघाटन करण्यात आले.
पारायण सप्ताह निमित्ताने सात दिवस संपूर्ण गाव स्वच्छ करून गावातील अंतर्गत रोडवर पाणी मारून रांगोळी टाकून महिलानी सहभाग घेतला. सात दिवसांच्या सप्ताहात गावात दारू, जुगार, मांसाहार व इतर वाईट गोष्टीवर संपूर्ण बंदी घालण्यात आली होती. गावातील रस्त्यावर कचरा खर्याची प्लास्टीक पन्नी सुद्धा टाकणे वर बंदी होती. गावातील सांडपाणी , रस्त्यावर वाहणारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सप्ताहात कीर्तन, भजन, प्रवचन व व्यसनमुक्तीवर चर्चा असे कार्यक्रम घेण्यात आले.
पारायण सप्ताह च्या अखेर च्या दिवशी कर्मयोगी तुकाराम दादा सार्वजनिक वाचनालयचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांचे हस्ते करण्यात आले. विजय लगारे यांनी आपल्या भाषणात गावातील तरुण युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे ह्यासाठी कायद्याप्रमाणे पोलिस प्रशासनाची आवश्यक ती मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले. वाचनालयातील पुस्तकातून ज्ञानी बनावे वेगवेगळे माहिती मिळवून वरिष्ठ पातळी गाठावी असेही ते म्हणाले.
इतर मान्यवरानी वाचनालयामुळे जिवनमान कसे उंचावते ह्याबाबीवर प्रकाश टाकला. व्यासपीठावर सरपंच वैशाली गोडे, पोलीस पाटील संतोष निरे, तंटामुक्त अध्यक्ष वसंत कडू, सामजिक कार्यकर्ते नारायण गोडे, कमलाकर कोसारकर, सुखदेव गोडे, प्रभाकर ठाकरे, डॉ श्याम भोयर, उपस्थित होते. कार्यक्रचे संचलन प्रदीप गोडे यांनी केले तर आभार नारायण गोडे यांनी मानले. कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामवासीयांनी महा प्रसादाचा आस्वाद घेतला.