वणीमधल्या मोर्चामध्ये मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

0

रवि ढुमणे, वणी: बुधवारी वणीत विविध सामाजिक संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मार्चामध्ये भिमा कोरेगाव येथील निंदनीय प्रकाराचा निषेध करून या घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व संघटनांनी केली. मोर्चाच्या समारोपाला विविध संघटनेच्या सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात मुख्यमंत्री परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरले असून दंगलखोरांवर योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे प्रकरण चिघळले आणि त्यामुळे दंगलखोरांना रान मोकळे मिळाले. त्याला सर्वस्व मुख्यमंत्री जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

सकाळी साडेआठच्या सुमारास भारीप बहुजन महासंघाच्या नेतृत्त्वात शहरातील विविध आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते तसंच विविध पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनी बंदसाठी रॅली काढली.

100 ते 150 लोकांची ही रॅली जससशी वणी शहरात फिरू लागली तससशी रॅलीत सहभागी होणा-यांची संख्या वाढू लागली, सध्या 1500 ते 2000 लोक रॅलीत सहभागी झाले आहेत. बंदच्या हाकेला वणीकरांनी उत्सुर्त प्रतिसाद दिला. वणीतील व्यापारी प्रतिष्ठान बंद आहे. सोबतच शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आल्या. रॅली बस डेपो परिसरात जाताच काही काळ परिवहन मंडळाची बससेवा ही काही काळ बंद ठेवण्यात आली. त्यानंतर बससेवा पुर्ववत सुरू झाली. मोर्चा शांततेत पार पडला असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार मोर्चादरम्यान घडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.