मनिरत्नमचा भव्य दिव्य, ऐतिहासिक पोन्नियिन सिल्वन 2 (PS2) रिलिज
बहुगुणी डेस्क, वणी: सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांचा बहुचर्चित, भव्यदिव्य, ऐतिहासिक पोन्नियिन सिल्वन 2 रिलिज झाला आहे. पहिल्या भागाच्या यशस्वीतेनंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुस-या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. सुजाता थिएटरमध्ये या सिनेमाचे रोज दोन शो ठेवण्यात आले आहे. पहिला शो दुपारी 12 तर दुसरा शो सं. 6 वाजताचा असणार आहे. दुपारी 3 व रात्री 9 चा शो हा किसी का भाई किसी का जान या सिनेमाचा असणार आहे. PS2 प्रेक्षकांना सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने बघता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. आजपासून या सिनेमाची ऍडवॉन्स बुकिंग सुरू झाली आहे. बुकिंग सुरू होताच जवळपास अर्ध्या तिकीटचे ऍडवॉन्स बुकिंग झाले आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट दक्षीनेतील चोल साम्राजाचा राजा अरुलमोरीवर्मन याच्या सम्राट बनण्याच्या कहाणीवर आधारीत आहे. पोन्नियिन सेल्वन यांनीच राजेंद्र प्रथम या नावाने चोल साम्राज्यावर शासन केले. ते राजराजा चोल म्हणूनही प्रसिद्ध होते. सुमारे 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक कल्की कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या याच नावाच्या 1955 मधील पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे.
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाच्या पहिल्या भागात आजारी चोल सम्राट सुंदरा चोल (प्रकाश राज) यांचा धाकटा मुलगा अरुलमोरीवर्मन (जयम रवी) हा सिंहला बेटावर युद्धादरम्यान समुद्रात बेपत्ता झाल्याचे दाखवण्यात आले. यापुढे सिनेमाचा दुसरा पार्ट सुरू होतो. (पहिला भाग आपल्याला अमेझॉन प्राईमवर पाहता येईल.) चोल सम्राटाचा मोठा मुलगा आदित्य करिकलन (चियान विक्रम) याला आपल्या भावाच्या मृत्यूसाठी त्याची जुनी प्रेयसी नंदिनी (ऐश्वर्या राय बच्चन) जबाबदार असल्याचे वाटते. जी आता चोल सेनापती पर्वतेश्वरची पत्नी आहे आणि ती कट कारस्थान करून साम्राज्य डमगमगवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, चोल सम्राटाची मुलगी राजकुमारी कुंदवई (त्रिशा कृष्णन), तिचा प्रियकर आणि आदित्यचा मित्र वंध्यवन (कार्ती) हे हा कट उढळण्याचा प्रयत्न करत आहे. पोनियिन सेल्वनच्या मृत्यूची बातमी कळल्यावर, आदित्य आणि त्याचा काका मदुरांतकन चोल राज्याच्या सिंहासनासाठी स्पर्धा सुरू होते. यादरम्यान, साम्राज्याशी संबंधित अनेक रहस्ये आणि षड्यंत्र समोर येतात. चोल साम्राज्याच्या सिंहासनावर अखेरीस कोण विराजमान होतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावे लागेल.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.