निलगिरी बनात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणी – घुग्गुस महामार्गावर मंदरजवळील निलगिरी जंगलात एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज 19 जून सोमवार दुपारी 1 वाजता दरम्यान उघडकीस आली. सनी तिरुपती कुन्नुरवार (22) रा. जैताई नगर वणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचले. सनीने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.