जितेंद्र कोठारी, वणी: कुर्ली शेतशिवारात एका वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमा किसन आत्राम (65) रा. कुर्ली असे आत्महत्या करणा-या वृद्ध शेतक-याचे नाव आहे. शनिवारी भीमा हे नेहमी प्रमाणे त्यांच्या शेतात गेले होते. संध्याकाळच्या सुमारास त्यांनी त्यांच्या शेतात असलेले कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने परिसरात काम करणा-या शेतमजुरांच्या लक्षात ही बाब आली. मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी तातडीने याची माहिती शिरपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथे पाठवला. आज दुपारी त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भीमा यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली व आप्तपरिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.