अखेर 28 तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी पहाटे पेटवून घेतलेल्या विवाहितेचा आज सकाळी चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरस्वती दिनेश चार्लीकर (35) असे मृत महिलेचे नाव असून ती नवरगाव (उमरी) येथे तिच्या कुटुंबीयांसह राहायची. शनिवारी दिनांक 8 जुलै रोजी ती रात्री नेहमी प्रमाणे घरी झोपली होती. पहाटे 4 ते 4.30 वाजताच्या सुमारास ती उठली व वरच्या माळ्यावर गेली. तिथे तिने स्वत:ला पेटवून घेतले. तिच्या किंचाळ्या ऐकू येताच तिचे कुटुंबीय व शेजारी जागे झाले. त्यांनी वर जाऊन बघितले असता त्यांना सरस्वती जळताना आढळली. त्यांनी सरस्वतीला व खोलीला लागलेली आग विझवली. सरस्वतीला तात्काळ एका रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र आज दिनांक 10 जुलै रोजी सकाळच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. तिने आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सरस्वती हिच्या पश्चात पती, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

Podar School 2025

Comments are closed.