दिवसा खेळ चाले – तीन पत्ती जुगार खेळताना 11 जुगाऱ्याना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : निर्गुडा नदीच्या काठावर सुरम्य वातावरणात बसलेल्या गंगा विहार वसाहतीत एका दुमजली घरात दिवसा सुरु असलेले जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी छापा टाकला. शनिवार 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ताशच्या पत्त्यावर पैश्याची बाजी लावून हारजीतचा खेळ खेळताना 11 जुगाऱ्याना अटक केली. पोलिसांनी जुगाऱ्या कडून 9 हजार रोख व 7 दुचाकी वाहनसह 3 लाख 29 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

शहरातील गंगा विहार कॉलोनीमध्ये एका घरात जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार पो. नि. अजित जाधव यांना मिळाली होती. माहितीवरुन ठाणेदार जाधव यांनी सपोनि ओमप्रकाश पेंडकर यांना पोलीस पथकासह गंगा विहार कॉलनीत पाठविले. सपोनि पेंडकर यांनी संपूर्ण खात्री करून चिंतामणी अपार्टमेंटच्या मागे एका घरात धाड टाकली. पोलिसांनी घरात एका बंद खोलीत ताशच्या पत्त्यावर तीन पत्ती जुगार खेळताना 11 जणांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 9 हजार 20 रुपये रोख व ताशपत्ते जप्त केले. पोलिसांनी घराच्या बाहेर उभ्या असलेल्या 7 दुचाकी वाहनही ताब्यात घेतले.

जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी महेंद्र तुळशीराम तामगाडगे (60) रा. मेघदूत कॉलोनी, केशव मोतीराम पडोळे (70) रा. वसंत गंगा विहार, महादेव डोमाजी खिरटकर (51) रा. कनकवाडी, सिद्धार्थ उत्तम मुन (40) रा. राजीव गांधी चौक, चेतन आनंदराव आगलावे (39) रा. रविनगर, महेश रामदास कामडे (33) रा.शास्त्रीनगर, अब्दुल अन्सार अब्दुल फैजान (35) रा. काळे ले-आऊट, नितीन शामराव नागपुरे (35) रा. मोहूर्ली, सौरभ सुनिल उलमाले (31) रा. पद्मावती नगर, प्रशिल विनोद नाखले (24) रा. शास्त्रीनगर व सुभाष आनंदराव चिडे (49) रा. चिखलगाव या आरोपींना अटक केली. पोलिसांनी सर्व आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहा.पोलीस निरीक्षक ओमप्रकाश पेंडकर, वसीम शेख, सागर सिडाम, पुरुषोत्तम डडमल, शंकर चौधरी व पथकाने केली.

अवैध धंद्यांवर ठाणेदाराचा वॉच 

णी पोलीस ठाण्यात ठाणेदार पदावर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात ठिकठिकाणी लपून छपून सुरू असलेले मटका काऊंटर, प्रतिबंधित तंबाखू व गुटका विक्रेत्यांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.