जितेंद्र कोठारी, वणी: वणी पोलिसांनी अवैध धंद्यावर धडक कारवाई केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मागील एका महिन्यात मटका, जुगार, अवैध दारु, गुटखा, अवैध जनावर वाहतूक बाबत केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी 80 आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करून तब्बल 16 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वणी पोलीस स्टेशन येथे ठाणेदार म्हणून पोलीस निरीक्षक अजित जाधव रुजू होताच त्यांनी अवैध व्यवसायाविरुध्द धाडसत्र राबविले. शहरात ठिकठिकाणी लपून छपून सुरू असलेले मटका काऊंटरवर सतत छापेमारी करून 26 जून 2023 पासून तर 1 ऑगस्ट 2023 पर्यंत मटका जुगाराच्या 31 कार्यवाही मध्ये 61 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केले. या कारवाईत पोलिसांनी 9 लाख 91 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याच कालावधीत पोलिसांनी दारूबंदीच्या 14 कार्यवाही मध्ये 14 आरोपी कडून 40 हजार 60 रुपयांचा, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गुटका विक्रीची एका केसेसमध्ये 1 आरोपी कडून 4 लाख 12 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जनावरांच्या अवैध वाहतुक विरुध्द कार्यवाही करून 3 आरोपींना अटक करून 2 लाख 40 हजाराचा मुद्देमाल तसेच अवैध शस्त्र अधिनियम अंतर्गत कार्यवाहीत आरोपी कडून 2 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध व्यवसाय विरुध्द धडक कार्यवाही सोबत वणी पोलिसांनी 148 जणांविरुद्ध प्रतिबंधक कार्यवाही एका महिन्यात केली. यात कलम 107, 116 (3) (CRPC) अन्वये 120, कलम 110 (CRPC) नुसार 11, कलम 109 (CRPC) नुसार 11 व कलम 93 प्रो.ॲक्ट मध्ये 6 गुन्हा दाखल करण्यात आले.
Comments are closed.