डॉक्टर लोढांच्या समर्थनात आल्या विविध संघटना पुढे
जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठवड्याभरापासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या बाबत सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. याबात आता ग्रामीण डॉक्टर असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी व ठाणेदार वणी यांना निवेदन देण्यात आले. यात डॉक्टरांची बदनामी करणारा प्रकार त्वरित थांबला पाहिजे व बदनामी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी ग्रामीण विभागात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विलास बोबडे , डॉ. प्रविण वरारकर, डॉ. किशोर चवने, डॉ. सचिन गांवडे, डॉ. वैभव ढवळे, डॉ. अविनाश खापने, डॉ. विजय जोगी, डॉ. महमुद खान, डॉ. धिरज डाहुले, डॉ. जफ्फर पठान, डॉ. प्रवीण मत्ते यांची उपस्थिती होती.
मारेगाव डॉक्टर असोसिएशनकडून निषेध
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर हे नियमित रुग्णांकडे कर्तव्याचा भाग म्हणून डोळसपणे बघतो. अनेकदा रुग्ण हा डॉक्टरांच्या सल्ल्याकडे डोळेझाक करतात. असाच प्रकार मागील आठवड्यात घडल्याने या प्रकरणी वाजवी पेक्षा अधिकचा उहापोह करून डॉ. लोढा यांच्या बदनामीचा कट रचण्यात आला. यामुळे डॉक्टरांचे मनोबल खचून त्यांच्या प्रॅक्टिसवर विपरित परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देते वेळी डॉ. स्वप्ना केलोडे, डॉ. निर्मलकर, डॉ. मनीष मस्की, डॉ. नितीन पाचभाई, डॉ. हर्षाली आस्वले, डॉ. एकनाथ डाखरे, डॉ. नितीन पाटील, डॉ. कोटेजा, डॉ. श्रीकांत भगत, डॉ. दर्शना राजूरकर, डॉ. चंद्रकांत झाडे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य डॉक्टरांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही निषेध
डॉ. महेंद्र लोढा हे गेल्या दोन दशकांपासून ग्रामीण रुग्णालयात निस्वार्थ सेवा देत आहे. त्यांच्यामुळे ग्रामीण रुग्णालय वणी येथे गरीब रुग्णांच्या प्रसुती, सिजेरीयन ऑपरेशन, सोनोग्राफी, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे. त्यांनी आजपर्यंत कामात काहीही हयगय किंवा हलगर्जीपणा केला नाही. त्यांच्यामुळे आजपर्यंत ग्रामीण रुग्णालयात हजारो रुग्णांचे प्राण वाचलेले आहे. या प्रकरणी त्यांनी मानसेवा चिकित्सक पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्वरित नामंजूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी मुबीन शेख विजय नगराळे, रामकृष्ण वैदय, अजय अनपुरे, चेतन चौधरी, सुरेश पिसे, शकिल शेख, मेघराज गेडाम, इम्रान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments are closed.