जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज दुपारी वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान दहेगाव (घोन्सा) शेतशिवारात शेतातील बंड्यावर वीज कोसळून एका शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मनोज पाडुरंग गोहोकर (33) असे मृतकाचे नाव आहे. यात शेतक-याची पत्नी व वडील थोडक्यात बचावले.
मनोज हे दहेगाव येथील रहिवासी होते. त्यांची परिसरातील गोदाळा येथे शेती आहे. आज सोमवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी मनोज, त्याची पत्नी व वडील हे शेतात काम करीत होते. दरम्यान दुपारी 3 वाजताच्या सुमारास वादळी वा-यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हे तिघेही शेतातील बंड्यात आसरा घेण्यास गेले. तिथे असलेल्या एका खाटेवर हे बसून होते.
दरम्यान बंड्याच्या दरवाज्याजवळ अचानक वीज कोसळली. यात मनोज जागीच ठार झाला. तर मागे बसलेली त्यांची पत्नी व वडील बचावले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मनोजला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नुकतेच घरी जन्मले होते बाळ
सहा महिन्याआधीच मनोजची पत्नी सरला हिने एका मुलाला जन्म दिला होता. मात्र वडिलांची ओळख होण्याआधीच त्याला वडील गमवावे लागले. मनोजच्या पश्चात पत्नी सरला मनोज गोहकार (29), दोन मुले, आई वडील असा आप्त परिवार आहे. घरातील कर्ता पुरुषांचे निधन झाल्याने गोहोकर कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.
हे देखील वाचा:
25 लाखांच्या कथित खंडणी प्रकरणी डॉ. लोढा यांची पोलीस ठाण्यात तक्रार
Comments are closed.