जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांचे उपोषण स्थगित

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 6 दिवसांपासून नवजात अविकसीत बाळ प्रकरणी बाळाचे वडील, आजी व नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी बुधवारी रात्री जिल्हा शल्य चिकित्सक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले.

Podar School 2025

गेल्या 1 सप्टेंबर पासून बाळाच्या नातेवाईकांनी उपोषणाला सुरूवात केली होती. उपोषण सुरू असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे बुधवारी दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह उपोषण मंडपाला भेट देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांशी या संपर्ण प्रकरणावर चर्चा केली. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिनांक 14 सप्टेंबरपर्यंत चौकशीचा अहवाल सादर करून अहवालानुसार पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केले. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डॉ. महेंद्र लोढा यांनी काही ऑडिओ क्लिप सादर करून उपोषणकर्त्यांविरोधात फौजदारी कारवाईसाठी तक्रार केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले होते. दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री खंडणी मागितल्या प्रकरणी बाळाचे वडील आणि आजीवर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे शहरात खळबळ उडाली होती. बुधवारी सकाळी उपोषणकर्त्यांनी याबाबत पोलीस स्टेशन गाठले होते.

सध्या उपोषण थांबल्याने हे प्रकरण थंड झाले आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर अहवालानुसार या प्रकरणी पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लवकरच फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणी पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे याच्या अहवालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. खंडणी प्रकरणामुळे गुन्हा दाखल झाल्याने सदर प्रकरण आणखी वाढेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.