खेळाडूंना राज्यस्तरीय पातळीवर जाण्यास सुविधा उपलब्ध करा
जि. प. सदस्य संघदीप भगत यांचे सर्वसाधारण सभेत विविध प्रश्न
वणी, रवि ढुमणे: जिल्हा परिषद षाळांचे क्रिडा सामने होतात. विजयी चमू जिल्हा स्तरापंर्यंत खेळण्यासाठी जातात. मात्र पुरेशा सोई सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांना पुढे चाल मिळत नाही. ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर त्यांना राज्य व राश्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यास शासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य संघदिप भगत यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस व त्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी तालुकास्तरावर ज्या प्रकारे क्रिडा सामन्याचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी प्रथमता सर्व शाळांमधील खेळाडूंना प्रषिक्षण देवून त्यांचा सराव करणे क्रमप्राप्त आहे. काही शाळांतील षिक्षक याकडे जाणिवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. विशेषता बालकांचे शारिरीक, मानसिक व बौध्दीक विकास होण्याच्या दृश्टीकोनातून क्रिडा सामन्याचे आयोजन करण्यात येते. यात सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखिल एक भाग असतो. मात्र या सांस्कृतिक कार्यक्रमात काही शाळांतील मुख्याध्यापक सहभाग नोंदवितांना दिसले नाही. ग्रामिण भागातील शाळांचे व विद्याथ्र्यांचे सबलीकरण करायचे असेल तर गावातील जिल्हा परिषद शाळेला पुरेसे साहित्य उपलब्ध करून देणे. खेळण्यासाठी सराव करून घेणे आवश्यक आहे.
शिक्षण विभागाच्या खेळ व कला सवंर्धन मंडळाच्या वतीने यापुढे जे क्रिडा सामने आयोजीत केले जातील त्या खेळा सोबतच बुध्दीबळ,क्रिकेट,व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅटबिंटन, धावण्याच्या स्पर्धा, लांब उडी, उंच उडी, नेमबाजी यासारख्या राष्ट्रीय स्तरावर खेळविल्या जाणा-या खेळांचाही समावेष करण्यात यावा. जेणेकरून ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांना भविश्यासाठी चालना मिळेल. इतकेच नव्हे तर तालुकास्तरावरून विजयी होवून जिल्हा स्तरावर चमू खेळविल्या जाते. मात्र जिल्हा स्तरावरून पुढे जाण्यासाठी शासनाने कोणतेही क्षेत्र उपलब्ध करून दिले नाही. ग्रामिण भागातील विद्याथ्र्यांचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर या खेळाडूंना जिल्हा स्तरावरून विभागीय स्तर, व तेथून राज्य व राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्या असा प्रश्न राजूर-चिखलगांव जिल्हा परिषद गटाचे सदस्य संघदिप भगत यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला आहे.
दहेगांव शाळा पासवर्ड हेराफेरी प्रकरणाची चौकशी होणार?
सोबतच शालेय पोषण आहार, सरल पोर्टल, व इतर ऑनलाईन माहिती भरण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अशा कोणत्याही उपाययोजन करण्यात आल्या नाहीत. सर्व माहीती ही मुख्याध्यापकाने भरावयाची असल्याचे संबधीतांना उत्तर दिले असता वणी तालुक्यातील दहेगांव घों. येथील शाळेचा संगणकीय पासवर्डची हेराफेरी झाली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. असा प्रश्न जि.प.सदस्य संघदिप भगत यांनी उपस्थित केला असता. यासंबधी शिक्षण विभागाला वगळता या प्रकरणाची चैकशी प्रकल्प अधिकारी कुळकर्णी यांना करण्याच्या अध्यक्षांनी सुचना केल्या आहे. आता दहेगांव शाळेतील पासवर्ड हेराफेरीचे प्रकरण नवीन वळणावर येवून ठेपले आहे.