तान्हा पोळा निमित्त नंदी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : वणी शहरात तान्हा पोळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाते. शहरातील शेकडो बालगोपाल लाकडाच्या नंदी बैलाची आकर्षक सजावट करून बेंडबाजासह  आंबेडकर चौक परिसरात मोठा मारोती देवस्थान येथे आणतात. उत्कृष्ट सजावट केलेल्या नंदी बैलाला आकर्षक पारितोषिक दिल्या जाते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठा मारोती देवस्थान समितीच्या वतीने नंदीबैल सजावट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

तान्हा पोळा उत्सवमध्ये नंदीबैल सजावट स्पर्धेत 1101 रुपयांचा पहिला बक्षीस राजकुमार अमरवाणी यांचे तर्फे, द्दितीय बक्षीस 701 रुपये नितीन बिहारी यांचे कडून तर तृतीय बक्षीस 501 रुपये तान्हा पोळा उत्सव समिती तर्फे देण्यात येणार आहे. शिवाय इतर स्पर्धकांना 50 प्रोत्साहनपर बक्षिसे दिले जाणार आहे. बाल गोपलानी आपल्या नंदी बैलाची आकर्षक सजावट करून स्पर्धेत भाग घेण्याचा आवाहन आयोजक समितीने केला आहे.

नंदीबैल सजावट स्पर्धेची अधिक माहितीसाठी आयोजन समितीचे रवी बेलुरकर, दौलत वाघमारे, प्रमोद लोणारे, चंद्रन मोहुर्ले, नितीन बिहारी, शिवा आसुटकर, पुरुषोत्तम मांदाडे, राजकुमार आसवानी, बंडू गोखरे व सतीश कामटकर यांच्याशी संपर्क साधावा.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.