तिघींच्या मदतीने डॉक्टरची पत्नीला मारहाण

प्रकरण दडपण्यासाठी राजकीय बळाचा वापर 

0

वणी (रवि ढुमणे): वणीतील नांदेपेरा रोड लगत असलेल्या गायकवाड लेआऊट भागातील डॉक्टरने तीन मुलींच्या मदतीने पत्नीला सतत त्रास देत मारहाण केल्याची तक्रार पीडित पत्नीने पोलिसात देण्याआधीच राजकिय पुढाऱ्यानी दबावतंत्र वापरायला सुरुवात केली. परिणामी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंद करायला दोन दिवस उशीर झाला असल्याचे दिसून आले.

डॉक्टर म्हणजेच देवदूत… व्याधीवर उपचार करून लोकांची सेवा करणें. परंतु हल्ली सेवा राहिलीच नाही. दवाखाना म्हणजेच रुग्ण आपल्याकडे वळविण्यासाठी जणू एक स्पर्धेचा बाजारच झाला आहे.  यात अनेक डॉक्टरांनी राजकीय आश्रय घेतला आहे.  याचं जोरावर त्यांचे काळे पिवळे धंदे थाटात सुरू आहेत.  असाच काहीसा प्रकार!  राजकीय पाठबळ असलेला डॉक्टर…

शहरातील नांदेपेरा रस्त्यालगत असलेला गायकवाड लेआऊट.  या भागात शिवसेनेने जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचे तिकीट बहाल केलेल्या डॉक्टरचा दवाखाना आहे. सोबतच निवास पण तिथेच आहे. या डॉक्टरची पत्नी एका पतसंस्थेत नोकरीवर आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकांसाठी देवदूत असलेला डॉक्टर पत्नीला मारहाण करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. सततच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरचा पत्नीने आपल्या मुलांना घेऊन वडिलांकडे आश्रय घेतला आहे.  डॉक्टरचा दवाखान्यात मुली कामासाठी आहेत.  वणी,चिखलगाव व नागपूर येथील मुली सोबत असल्याने डॉक्टरचा पत्नीला त्रास आणखीच वाढला आहे.

गेल्या 13 जानेवारीला या डॉक्टरने कहरच केला. पत्नी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पत्नीला व मुलांना मारहाण केल्याची तक्रार डॉक्टरच्या पत्नीने स्वतः पोलिसात दिली.  इतकेच नव्हे तर दवाखान्यात असलेल्या मुलींनी सुद्धा शिवीगाळ केली असल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे.  डॉक्टरची पत्नी पोलिसात तक्रार देणार असल्याची भनक डॉक्टरला लागताच त्याने लगेच सूत्र हलविले. परिणामी राजकीय बळाचा वापर सुरू झाला.

तक्रार होण्याआधीच ती दडपण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले.  डॉक्टरची पीडित पत्नी प्रचंड दहशतीत होती. तिला धड आपलं म्हणणं सुद्धा सांगता येत नव्हतं अशी अवस्था होती.  शनिवारला रात्री तीने पोलिसात येऊन तक्रार दिली परंतु राजकीय दबाव की अन्य कोणते कारण याच जंजाळात गुन्हा दाखल करायला पोलिसांना दोन दिवस लागले.   महिला तक्रार द्यायला आली तर चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त असतांना इथे गुन्हा दाखल करायला तब्बल 48 तासाहून अधिक वेळ लागला यामागे पोलिसही दबावाला बळी पडले असल्याचा प्रत्यय आला.

शेवटी सोमवारला पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून डॉक्टर आणि वणी,चिखलगाव व नागपूर येथील मुलींविरुद्ध भा दं वि 323,504,34 कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.  आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार? यात कोणत्या राजकीच आजी माजी राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे? आणि विशेष म्हणजे सहकार्य कोणत्या गोष्टी साठी आहे.  मुलींनी नवरा बायकोच्या मध्ये भाग का घेतला?याची कारणे पुढे येईलच. आणि ते राजकीय पुढारी व डॉक्टरचा भांडाफोड होईल हे या प्रकरणावरून दिसायला लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.