यंदा नवशक्तीचा नवरात्र महोत्सव राहील खास

दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण

जितेंद्र कोठारी, वणी: भारत उत्सवप्रिय देश आहे.  इथं प्रत्येक उत्सव अतिशय आनंदात साजरा होतो. आता लवकरच नवरात्रौत्सव सुरू होईल. स्थानिक डॉ. आंबेडकर चौकातील शिवशक्ती मंडळाचं नवरात्र खास राहणार आहे. इथल्या दुर्गा माता मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं. नूतनीकरणही झालं. त्यामुळं देवीच्या दर्शनाला आणि मंदिर पाहायला रीघ लागणार आहे.

जवळपास 25 वर्षांपूर्वी देवीचं छोटेसं मंदिर उभं झालं. या मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्याचं ठरलं. नवशक्ती मंडळाचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली काम सुरू झालं. या कार्यात समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांनी भरभरून सहकार्यदेखील केलं. संपूर्ण भारतातले अनेक कुशल कारागीर आलेत. काम सुरू झालं. मंदिराचा संपूर्ण कायापालटच झाला. लवकरच याचा लोकार्पण सोहळादेखील होणार आहे.

नऊ दिवस महाआरती, अष्टमीला नवचंडिका महायज्ञ, अशा विविध कार्यक्रमांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या नवरात्र उत्सवात वणी विभागातील भक्तांनी सहभागी होण्याची विनंती दुर्गा माता मंदिराचे अध्यक्ष रवी बेलुरकर, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव प्रमोद लोणारे, कोषाध्यक्ष चंदन मोहुर्ले, सदस्य नितीन बिहारी, पुरुषोत्तम मांदाडे, शिवराम आसुटकर, राजकुमार अमरवानी,

अमोल बदखल, राजेंद्र जयस्वाल, सतीश कामटकर, मारोती गोखरे, स्वप्नील बिहारी, समिर लाभसेटवार, अशोक मांदाडे, नितीन मसेवार , प्रकाश दौलतकार, अमोल मनवर, मुन्ना महाराज तुगनायत, चंद्रकांत फेरवानी, अशोक बतरा, विनोद मुथा यांनी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.