झरीमध्ये ५ नगरसेवकांचा प्रहार पक्षात प्रवेश
प्रहारच्या वाढीमुळे इतर पक्षांच्या डोकेदुखीत वाढ
रफीक कनोजे, झरी: नगरपंचायत च्या ५ नगरसेवकांनी रवीवार (ता. १५) ला दुपारी ३ वाजता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या विचार व कार्याने प्रभावित होऊन प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश कांग्रेस, भाजप व शिवसेना पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरु शकतो. प्रहारचे झरी तालुका प्रमुख आसीफ कुरेशी यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे आणि जिल्हाप्रमुख विलास पवार यांच्या मार्गदर्शनात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
झरी तालुका प्रमुख म्हणून जवाबदारी घेतल्या नंतर आसिफ कुरेशी यांनी पक्ष संघटन वाढीसाठी घेतलेले परिश्रम उत्साह वाढवणारे आहेत. झरी तालुक्यात प्रहारच्या माध्यमातून आमदार तथा पक्ष प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या’सेवा, त्याग, समर्पण, संघर्ष या प्रवाहात येत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षात पाच अपक्ष उमेदवार विलास डोहे, जगदीश गेडाम, सौ. सारिकाताई चिंतामण किनाके, श्रीमती रेखाताई वाढीवा, सौ. निर्मलाताई लवकुश कोडापे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात अधिकृत प्रवेश झाले.
जिल्हाप्रमुख विलास पवार , झरी तालुखा प्रमुख आसिफ कुरेशी, झरी शहरप्रमुख संजय कोडापे, उपशहर प्रमुख चिंतामण किनाके, सचिव विलास येरावार, कोषाध्यक्ष मारोती गाउमे उपस्थीत होते. पांढरकवडा नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रथमच प्रहारने 19 पैकी 14 उमेदवार निवडून आले. राजकीय वारसा नसलेल्या उमेदवाराला प्रथमच मतदारांनी नगराध्यक्षपदी विराजमान केले. हा बदल दूरगामी परिणाम करणारा आहे. भाजप, कॉंग्रेस, शिवसेना व घराणेशाहीसाठी इशारा देणारा आणि त्यांना आत्मचिंतन करायला लावणाराही आहे.
देश व राज्य पातळीवरील मातब्बर नेतृत्वांना दुर्लक्षून चालणार नाही. झरी हा कांग्रेसचा बाल्लेकील्ला होता पण आज भाजपच्या ताब्यात आहे. झरीसारख्या आदिवासी दुर्गम तालुक्यातील पाच नगरसेवकांनी प्रहार मध्ये केलेला प्रवेश भाजप, कॉंग्रेस, शिवसेना आत्मचिंतन करायला लावणाराही आहे.कॉंग्रेस व भाजप साठी आगामी विधानसभेतही डोकेदुखी ठरणारा असु शकतो.