शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

0

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील रासा येथील हरी रामा जेऊरकर हा शेतकरी रविवारला घरून शेतात गेला होता. तर मुलगा व घरातील मंडळी घरीच होती. दरम्यान हरीने शेतात विष प्राशन केले व तेथेच पडून राहिला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेजारील शेतकऱ्याला हरी शेतात पडून दिसताच त्याने हरीच्या मुलाला यासंबंधी ची माहिती दिली. सर्वांनी मिळून हरीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत हरीच्या शरीरात विष सर्वत्र पसरले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात सांगितले. मात्र वेळ अपुरा असल्याने हरीला वणीच्या सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्न केले शेवटी सोमवारला सायंकाळी हरीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसात देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.