रफीक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील वणी-पाटण राज्य मार्गावरील गुरुकुल कान्व्हेंट इंग्लीश शाळेजवळ गुरुवारी (ता. ११) पहाटे ४-४५ च्या दरम्यान वाघ दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच पाच दिवसांपासून खडकी मार्गावर मार्निंग वाकींगला जाणाऱ्यांच्या संख्येत देखील घट झाली आहे. मुकुटबन परिसरात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे.
चार महिन्यांपूर्वी मांगली येथे तीन युवकाला वाघाने जख्मी केले होते. तीन महिन्यापूर्वी अनेक लोकांना शेख फरीद बाबाच्या व बीएसएनएल ऑफिसच्या परिसरात वाघ दिसला. त्याच परीसरात मुकुटबन येथील शेतकरी नंदु मंदुलवार व पाच महिलाना १५ नोव्हेंबरला गुरुवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता शेतातील कापुस वेचणीचे काम करून नंदु मंदुलवार याचे बैलगाडीत बसुन घरी परत येत असताना अवघ्या पाच फुटावर वाघ दिसला. त्यामुळे ते घाबरून आले होते.
वाघ दिसल्याची माहिती मिळताच रफीक कनोजे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मुकुटबन वारे ह्यांना मोबाइल वरुन संपर्क करुन कल्पना दिली. त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी वारे यानी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याची व नागरीकाना एकटे न जाता समुहात अवागमन करण्याच्या सूचना देण्यात आली. आता शारदा कंस्ट्रक्शन कं. नांदेडचे कामगार मुकुटबन येथे चौपदरी रस्त्याचे काम करीत आहे. त्यांच्यापैकी एका कामगाराला पहाटे पाच वाजता मुकूटबन राज्य मार्गावर रेल्वे रुळाकडुन येत असताना वाघ दिसल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडली आहे. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्या काही नागरीकानी बंद केले. तर काहीनी रुइकोट मार्गावर सकाळी फिरायला जाणे पसंद केले आहे.