आई-वडील गेले मयतीला, मुलगी घरून बेपत्ता

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याची तक्रार दाखल

 

Podar School 2025

जितेंद्र कोठारी, वणी: झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन हद्दीत एका गावातून अल्पवयीन मुलगी आई वडील मयतीत गेल्याची संधी साधून घरुन बेपत्ता झाली. फिर्यादी वडिलांच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फिर्यादीचे मामा मरण पावल्याने पती पत्नी दोघे 28 ऑक्टो. रोजी वणी तालुक्यातील नवेगाव येथे गेले होते. तेव्हा त्यांचा 18 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाची मुलगी घरीच थांबले होते. मयतीतून सायंकाळी परत आल्यावर त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यांनी मुलाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.

आजूबाजूच्या घरात व गावात शोध घेतला असता मुलगी कुठेही मिळून आली नाही. नातेवाईकांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी मुलगी आमच्याकडे आली नसल्याचे कळविले. अखेर वडिलांनी मुकुटबन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.