ट्रान्सफार्मर फोडून 40 किलो तांब्याचा तार लंपास

वेकोली उकणीच्या प्रतिबंधित क्षेत्रात चोरट्यांचा शिरकाव

जितेंद्र कोठारी, वणी : वेकोलिच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून चोरट्यांनी तांब्याचे 40 किलो तार चोरी केल्याची घटना 6 नोव्हे. रोजी उघडकीस आली. मात्र वेकोली अधिकाऱ्याकडून चोरीच्या घटनेची तक्रार तीन दिवसानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यामुळे  वेकोलिच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

Podar School 2025

तक्रारदार सुरक्षारक्षक गयाप्रसाद रामप्रसाद केवट (46) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उकणी कोळसा खाणीच्या सहा.क्षेत्रीय प्रबंधक यांचे कार्यालय जवळ वर्कशॉप आहे.  दिनांक 5 नोव्हेंबरचे रात्रीचे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने वर्कशॉपमध्ये वेल्डिंग मशीन सेक्शनमधील 63 KVA चा ट्रान्सफार्मर फोडून त्यातील 30 ते 40 किलो तांब्याचा तार चोरून नेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्द 40 हजार किमतीचा तांब्याचा तार चोरी केल्याप्रकरणी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुनील दुबे करीत आहे.

Comments are closed.