चोराले नाही सीसीटीवीचं भेव, भरदिवसा मंदिरातील दानपेटीवर डल्ला

शिरपूर येथील देवस्थानातील घटना, चोरटे सीसीटीव्हीत कैद

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील शिरपूर येथील कैलास शिखरावरील शिवालयात चोरट्यांनी चक्क दानपेटीवर डल्ला मारला. बुधवारी दुपारी 3.30 वाजता ही घटना घडली. दरम्यान, चोरी करणारे चोरटे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. बुधवारी दुपारी परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. यामुळे कैलास शिखर मंदिरात भक्त नव्हते. याच संधीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी शिवालयात प्रवेश केला. मंदिरात ठेवून असलेली दानपेटी फोडली व त्यातील रक्कम लंपास केली. मंदिरातील दानपेटी फोडल्याचे गुरुवारी सकाळी पुजाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब मंदिर समितीच्या सदस्यांना सांगितली. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दोन संशयित चोरटे दिसून आले. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली. हे स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शिरपूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेतली असून चोरी करून फरार झालेल्या आरोपीचा माग काढला जात आहे.

हे देखील वाचा:

कटू आठवणी: बाजार समिती गोळीबार प्रकरणाला आज 17 वर्षे पूर्ण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वाहतुकीचे नियम मोडतोय दुसराच, चालान येतेय वणीच्या शिक्षकाला

Comments are closed.