पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरालगत असलेल्या नविन वागदरा येथे सार्वजनिक खुल्या जागेवर सुरु असलेल्या एका जुगारावर पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी दिनांक 7 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नविन वागदरा येथिल माऊली मंदिरासमोरील सार्वजनिक खुल्या जागेवर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्यांना तेथे काही इसम पत्त्याचा जुगार खेळताना आढळले. खात्री होताच पथकाने मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली.
यावेळी गंजी पत्त्यावर पैशाची हार जीत खेळणाऱ्या चार जणांना रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी 2100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपी हे नविन वागदरा येथीस रहिवासी आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 (अ ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अजित जाधव यांच्या आदेशावरून सपोनि/ दत्ता पेंडकर , पोकॉ /वासिम शेख, गजानन कुडमेथे, ललित यांनी केली.
Comments are closed.