क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाने गमावला डोळा

नवीन लालगुडा येथील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

 

Podar School 2025

विवेक तोटेवार, वणी: क्षुल्लक कारणावरून झालेला वाद  मारहाणी पर्यंत पोहोतला. यात एका तरुणाला डोळा गमवावा लागला. लालगुडा येथे ही घटना घडली. शुभम बंडू वाळके (25) रा. नवीन लालगुडा असे डोळा गमवाव्या लागण-या तरुणाचे नाव आहे. यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शुभम हा नवीन लालगुडा येथे राहतो. त्याच भागात आरोपी गौरव मोरे (25) राहतो. तो ऑटोचालक आहे. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास शुभमचे क्षुल्लक कारणावरून ऑटो चालक गौरव मोरे (25) याच्यासोबत वाद झाला. या वादात गौरव याने शुभमला लाकडी काठीने मारहाण केली. या मारहाणीत शुभमच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली. 

शुभमला त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथ डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे रेफर केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाला. परंतु इजा गंभीर असल्याने त्याला नंतर नागपूर येघे उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूरला उपचार न झाल्याने त्याला हैदराबाद येथे दाखल करण्यात आले. परंतु या ठिकाणीही त्याचा उपचार होऊ शकला नाही. 

या मारहाणीत डावा डोळा गमवावा लागला. हैदराबादहून उपचार घेऊन आल्यानंतर 20 डिसेंबर रोजी त्याने आरोपी गौरव मोरे विरुद्ध वणी पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 326 नुसार गुन्ह दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विठ्ठल बुरेवार करीत आहे.

Comments are closed.