महाविद्यालयाच्या निवडणुकीत फडकला युवासेनेचा भगवा
रोहन आदेवार, वणी: वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या झालेल्या निवडणुकीकरिता युवासेनेचा भगवा फडकला आहे. युवा सेनेचा सूरज चरणदास मडावी हा बहुमताने विजयी झाला आहे. त्याने एबीवीपी आणि संभाजी ब्रिगेडचा पराभव दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे कॉलेजमध्ये अद्यापही युवासेनेचेच वर्चस्व असल्याचे युवासेनेने दाखवून दिले आहे.
गुरुवारी विद्यापीठाने निर्धारित केलेल्या निवडणूक पद्धतीनुसार दुपारी 3 वाजता विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीची प्रकिया सुरु झाली. 4.30 वाजता निवडणुकीचा निकाल लागला. यात सूरज मडावी 13 मते घेऊन विजयी झाला.
या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून जे वर्गामधून अव्वल गुण प्राप्त केले अशांना मतदानाचा अधिकार होता. यामध्ये 20 मतदार होते. विद्यापीठ प्रतिनिधीसाठी सूरज मडावी, भारती शेरकी आणि मंगेश गोहोकार यांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी मंगेश गोहोकारचा फॉर्म बाद झाला. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या भारती शेरकी आणि सूरज मडावी यांच्यात थेट लढत झाली. यात 20 पैकी 19 जणांनी मतदान केले. तर एक मत अवैध ठरले. 19 मतां पैकी सूरजला 13 तर 4 भारतीला व 2 इनवॅलिड असे एकून 6 मते मिळाली.
हि निवडणूक जिकल्यांतर सूरजने सर्वांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या विजयाचे श्रेय त्याने आपल्या मित्रांना व सहकाऱ्यांना दिले. त्यानंतर सूरज ला शुभेच्छा देण्याकरिता आशिष खुलसंगे (युवासेना उप जिल्हाप्रमुख), बंटी ठाकूर (उप जिल्हाप्रमुख विद्यार्थीसेना), आनंद बोथले, हर्षित जुनेजा व समस्त मित्र मंडळ आले होते. त्यांनी हार घालून सुरजचे अभिनंदन केले. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या हार घालून जयघोष केला. तसंच विद्यार्थी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
या विजयाबाबत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख आशिष खुलसंगे वणी बहुगुणीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की…
यावर्षीही महाविद्यालयाच्या निवडणुकीत भगवा फडकला आहे. हे यश सर्व विद्यार्थ्यांचं, युवासेना आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांचं आहे. तरुणांची ही निवडणूक असली तरीही यावर्षीही इतर पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला. मात्र अखेर विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. या विजयामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही तरुणांचंच वर्चस्व राहणार आणि तेच विधानसभेची निवडणूक गाजवणार हे नक्की. सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आम्ही आश्वासन देणार नाही तर ते प्रश्न मार्गी लावू.
विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी संसदेचे गठन होणे गरजेचे आहे. त्यानुसार विद्यापीठातील प्रत्येक कॉलेजमध्ये निवडणूक घेतली जाते. विजयी उमेदवार हा विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष आणि सचिवपदासाठी निवडणुकीसाठी उभा राहू शकतो आणि मतदान करू शकतो.