वणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी व मुलीला रूमबाहेर जाण्यास सांगून उचलले पाऊल

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील महात्मा फुले चौकातील एका 43 वर्षीय इसमाने राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. कुणाल पुरुषोत्तम मोडक (43) असे मृताचे नाव आहे. कुणाल हे मजुरी करायचे. फ्रुट विक्री, राखी असे सिजननुसार तर दिवाळी नंतर ते कलरींगचे काम करत होते. सोमवारी सकाळी कुणाल हे पेंटिंगचे काम करण्याकरिता घराबाहेर पडले. काम न मिळाल्याने ते परत घरी आले. पत्नीला ‘खोलीमधून बाहेर जा. मला आराम करायचा आहे’, असे म्हटले. त्यामुळे पत्नी व मुलगी ही दुसऱ्या खोलीमध्ये गेल्या. थोड्या वेळाने पत्नीने डोकावून पाहिले असता कुणाल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले दिसले. त्यामुळे कुणाल यांच्या पत्नीने लगेच पावशीच्या साहाय्याने दोर कापून खाली उतरवून वणीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुणाल यांनी आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.

Podar School 2025

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.