घरचे गेले अंत्यसंस्काराला, घरी तरुणीने केली आत्महत्या

अंत्यसंस्कार सुरु असतानाच मुलीने गळफास घेतल्याची वार्ता

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये राहणा-या एका 21 वर्षीय तरुणीने घरी कुणी नसल्याची संधी साधून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. सारिका लक्ष्मण आसमवार असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. एका नातेवाइकाचे निधन झाल्याने सारिकाच्या घरचे सर्व लोक अंत्यदर्शनासाठी गेले होते. यावेळी सारिका घरी एकटीच होती. दरम्यान तिने नायलॉन दोरीने स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरी बांधून आत्महत्या केली. याबाबत तिच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच, कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. आधीच नातेवाईकांच्या मृत्यूचे दु:ख असताना त्याच वेळी घरातील मुलीच्या देखील मृत्यूची बातमी कानावर आल्याने आसमवार कुटु्ंबीय हादरून गेले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

Podar School 2025

Comments are closed.